दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा काही दिवसावर होळी,रंगपंचमी हा सण येऊन ठेपला आहे.या सणाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. त्यानिमित्ताने बाजारपेठेत होळीच्या पर्वावर पिचकारी, रंग या साहित्याने दुकाने सजली असून महागाईचे चटके आता रंग, पिचकारीवरही दिसू लागले आहे.कोरोना सावटात निर्बंध असल्यामुळे
कोणतेही सण उत्सव होऊ शकले नाही. त्यामुळे आता. निर्बंध उठल्याने बाजारपेठेत रंग व पिचकारीचे दुकान सजल्याचे दिसत आहेत. ग्राहकही चांगला प्रतिसाद देऊन पिचकारी, रंग, गुलाल खरेदी करतांना दिसून येत आहेत. दुकानात विविध मुखवटे टोपी, प्लास्टिक मास्क व इतर.साहित्य लहान मुलांचे आकर्षनाचे केंद्र होत आहे. परंतु विविध वस्तुवर महागाईचे सावट दिसायला लागले आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या धुलीवंदन, होळी सणानिमित्ताने ग्राहकही आता खरेदीसाठी धडपड करीत आहेत. त्यामध्ये लहान मुले व तरुणवर्ग साहित्य खरेदी करण्यासाठी आकर्षित होत आहेत. एकंदरीत होळीच्या सणानिमित्ताने बाजारपेठेत चहल-पहल सुरु झाली आहे.रंग पंचमीच्या सणामुळे शहरातील बाजारपेठ चांगलीच सजली आहे.