दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधि – शिवकुमार बिरादार
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सर्वपक्षीय चेअरमन पदी सुरेश पंदिलवार यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्वपक्षीय विविध सेवा सहकारी सोसायटी वर काॅग्रेस पक्षाचे युवा नेते दिनेश आवडके यांचे चार सदस्य तर आमदार डॉ तुषार राठोड यांचे कटर समर्थन हेमंत खंकरे यांचे एक सदस्य तसेच व्यंकटराव पाटील यांचे आठ सदस्य असून या मुक्रमाबाद सेवा सहकारी सोसायटी सर्वपक्षीय एकूण १३ सदस्य असून या सदस्यांनी सर्वानूमते निवड दि २ मे रोजी सकाळी ११ वाजता सेवा सहकारी सोसायटी येथे चेअरमन पदी सुरेश पंदिलवार तर व्हीईस चेअरमन पदी सौ.हेमलता बालाजी नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सोसायटीवर बिनविरोध निवडून आलेले सभासद बालाजी कोठारे, बंडेप्पा गंदीगुडे, विठ्ठलराव शिंदे, रविंद्र पंदिलवार, शिवशंकर सुर्यवंशी, सोमनाथ मठ्ठदेवरू, व्यंकटराव कंटाळे, सदाशिव बोयवार, एकनाथ अचमलवाड, श्रीदेवी खंकरे कमलबाई बाजगिरे,या सर्वपक्षीय सदस्य उपस्थित होते.
यावेळी जि.प.सदस्य व्यंकटराव पाटील, सुभाष बोधने, काॅग्रेसचे युवा नेते दिनेश शिवराज आवडके, हेमंत खंकरे,रविंद्र पंदिलवार, बबन पाटील, बालाजी पाटील, बालाजी नाईक, सरपंच नागनाथ रेड्डी, जळबा गुमडे,गणपत क्यादरकुंटे, श्रीकांत काळे, जयराम बाच्चे, योगेश देवकक्ते, गौस पठाण, प्रकाश पंदिलवार, सुरेश पंच्छक्षरे, प्रकाश कुंडगिरे, सुरेश एमेकर,लालू बोयवार, शंकरआप्पा खंकरे, शिवराज पाटील,बालाजी पसरगे, बालाजी बोधणे, संदीप पंदिलवार, रामराम पाटील, गंगाधर चामलवाड, संदीप पाटील अतनूरे, विनोद आपटे, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित व्यापारी, सरपंच,उपसरपंच,सेवा सहकारीचे सदस्य, चेअरमन व व्हाईस गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.