दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : रोनाने जगभरात थैमान घातलेलं असताना त्यावर रशियन वैज्ञानिक आंद्रे बोटीकोव्ह याने ‘स्पुटनिक व्ही’ ही लस तयार केली होती. अशा जगप्रसिद्ध वैज्ञानिकाची गुरुवारी गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.
प्रकरणी पोलिसांनी एका 29 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
47 वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह हे गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॅण्ड मॅथेमॅटिक्स येथे वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते. गुरुवारी ते मॉस्को येथील घरी आराम करत असताना आरोपी त्यांच्या घरी आला. काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सदर तरुणाने आंद्रे बोटीकोव्ह यांची गळा आवळून हत्या केली. सदर आरोपीने कौटुंबिक वादातून आंद्रे यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
स्पुटनिक व्ही लस तयार करणाऱ्या 18 वैज्ञानिकांच्या टीममध्ये आंद्रे यांचा समावेश होता. 2021 मध्ये त्यांच्या या कार्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादमिर पुतीन यांनी त्यांचा सत्कार केला होता.