दैनिक चालू वार्ता राजगुरूनगर ता. प्रतिनिधी-मयुरी वाघमारे.
========================
राजगुरूनगर :- राजगुरूनगर ता. खेड, जि – पुणे.
राजगुरूनगर नगरपरिषद, राजगुरूनगर आयोजित स्वच्छ युथ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दि. 12 मार्च 2023 रोजी करण्यात आले. ठीक सकाळी 7 वाजता ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभिमान 3.0 अंतर्गत मा. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. ही स्पर्धा पुरुष व महिला या दोन गटात घेण्यात आली या स्पर्धेत 500 तरुण व तरुणीनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत उत्तीर्ण झालेले उमेदवार
*पुरुषगट :- प्रथम क्रमांक – सचिन भारतद्वाज, द्वितीय क्रमांक – सुरज भोर, तृतीय क्रमांक – प्रवीण टकले, चतुर्थ क्रमांक – शिवा केंद्रे.
*महिला गट :- प्रथम क्रमांक :-एश्वर्या खळदकर, द्वितीय क्रमांक – साक्षी बोऱ्हाडे, तृतीय क्रमांक – श्रावणी गाढवे, चतुर्थ क्रमांक – दिव्या रौधळ.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडला.
या बक्षीस समारंभसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम नागराध्यक्ष बाप्पू साहेब थिगळे, नगरसेवक मनोहर सांडभोर, खेड तालुका ठेकेदार संघटना आध्यक्ष नितीन सैद व राजगुरूनगर नगरपरिषद चे लेखापाल विकास वाघमारे साहेब व अभियंता पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता चारूबाला हरडे मॅडम, यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यकर्माचे निवेदन प्राध्यापक वरकड सर यांनी केले. विशेष सहकार्य क्रीडा संकुल व्यवस्थापक दीपक चव्हाण, जालिंदर मांजरे, रवी पाचारणे, विठ्ठल भोमाळे, किशोर दहीतुले, तसेच हरिचंद्र थोरात यांचे वय 70 वर्ष असताना देखील त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला.