दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- भूम परंडा वाशी तालुक्यातील शाळांना स्मार्ट डिजिटल बोर्ड तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणार असून यात हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांतीचे प्रणेते,महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, तथा धाराशिव व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेना उपनेते मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 15 मार्च 2023 रोजी भूम तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही आणि पेन चे वाटप भूम तालूका शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री सावंत साहेबांना भेटून या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.यावेळी उपजिल्हाप्रमुख दत्ता बापू मोहिते, तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, किशोर अंधारे साहेब, युवराज तांबे बाजार समिती संचालक भुम,चंद्रकांत सरडे, किशोर अंधारे साहेब,सरपंच विशाल अंधारे,सरपंच समाधान भोरे जाब माजी सरपंच समाधान सातव, उपसरपंच सागर भैया खराडे, उपसरपंच सुभाष देवकते वैभव अंधारे साहेब लक्षमण गुंजाळ आदी उपस्थित होते.