दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-
भोकर : शहरासह तालुक्यात जुगार मटका धूम धडाक्यात अनेक दिवसापासून सुरू असल्याची चर्चा सुरू होती,आज टाकलेली धाड व या अगोदर पण तालुक्यातील एका मोठ्या जुगार अड्डयावर धाड टाकली होती त्याच पोलिस अधिकाऱ्यानी आजची ही धाड टाकली असून शहरात सुरू असलेली चर्चा आज टाकलेल्या मटक्याच्या अड्डयावरील धाडीने खरी ठरली आहे.
शहरासह तालुक्यात जुगार,मटका,धंदयानी सर्वसामान्य व गोरगरीब तसेच अल्पवयीन मुलाना व्यसनाधीन केले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे यात काहीचे तर कर्ज बाजारी होऊन संसार ही उद्धवस्त झालेले आहेत.याला आळा घालण्यासाठी या अगोदर ही तालुक्यातील किनी येथील एका मोठ्या जुगार अड्डयावर धाड टाकण्याची मोठी धाडसी कार्यवाही पोलीस अधिकारी दिगंबर पाटील यांनीच केली होती. मागील महिन्यात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन नव्याने रुजू झालेले पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनानुसार धाडसी अधिकारी म्हणून शहरासह तालुक्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांनी पोलीस कर्मचारी स.पो.ऊ.नि.दिलीप जाधव,पोलीस अमलदार सुभाष कदम,पोलीस शिपाई परमेश्र्वर कळणे यांना सोबत घेऊन एका ठिकाणी मटका खेळत व खेळवीत असल्याची त्यांना गुप्त माहिती मिळाल्या नुसार गुप्त माहितीच्या आधारे व पो. नि. यांच्या मार्गदर्शनानुसार दि. १३-०३-२०२३ रोजी दुपारी अंदाजे २ वाजताच्या दरम्यान रेल्वे फाटक चिखलवाडी जवळील परिसरातील मटका अड्डयावर धाड टाकून मुद्देमालासह रोख रक्कम २६२० रुपये यासह शेख मन्नान शेख रहीम, शुद्धोदन रामराव पाटील, सुरेश मोहन करे तिघे ही राहणार भोकर यांना ताब्यात घेतले असून व्रत लिहीपर्यंत भोकर पोलिसात मुंबई जुगार कायदा कलम १२ अन्वये कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.