दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे
मंठा शहरातील मार्केट यार्ड परिसरातील श्री राम गुरुकृपा रक्त लघवी तपासणी केंद्र शॉटसर्किट मुळे आग लागून दहा लाख रुपयांचे नुकसान झाली आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की शहरातील मार्केट यार्डरातील श्री राम गुरुकृपा तपासणी केंद्राची संचालक शिवम खेडकर हे सकाळी केंद्रात येऊन साफसफाई करून शहरातील इतर दवाखान्यात सॅम्पल घेण्यासाठी गेले असता त्यांच्या तपासणी केंद्रातून धूर येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ अग्निशामक दल व पोलीस प्रशासन संपर्क करून माहिती दिली
अग्निशामक दलाने अधिक परिश्रम घेऊन आग आटोक्यात
ईलीक्ट्रिकलाईट, मायक्रोस्कोप, सेंट्रल फ्युज, संगणक, फ्रिज, इन्वर्टर सह केंद्रातील सर्व फर्निचर व सर्व उपकरणे शॉटसर्किट मुळे जळून खाक झाले
केंद्रातील फर्निचर सह संपूर्ण उपकरणे जळून खाक
आम्ही दोघे मित्रांनी बँकेची कर्ज काढून शहरातील मार्केट यार्डत श्री राम गुरुकृपा रक्त लघवी तपासणी केंद्र चालू केले मात्र या शॉटसर्किटमुळे तपासण केंद्रातील फर्निचर सह सर्व उपकरणे जळून खाक झाले आहेत. आता बँकेचे कर्ज कसे फेडावे याची चिंता आहे. यावेळी तलाठी व पोलीस प्रशासनाने पंचनामा केला आहे.
प्रसाद काकडे, शिवम खेडेकर या दोन तरुणांनी शिक्षण घेऊन शहरातील मार्केट यार्ड परिसरात श्रीराम गुरुकृपा रक्त तपासणी केंद्र कर्ज काढून चालू केले होते मात्र या आगीत सर्व उपकरणे जळून खाक झाली.
शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे बोराडे, मंठा नगरपंचायतचे नगराध्यक्ष बालासाहेब बोराडे, नगरसेवक प्रदीप बोराडे, विज महावितरणचे अभियंता मनोज भावसार यांनी भेट दिली.