दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी या पदावरून
भंडारा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकारी प्रा.यो. पदावर रुजू झालेले रविन्द्र सिताराम सोनटक्के यांचा लोहा तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने विक्की गार्डन पारडी येथे दि. २७ मार्च २०२३ रोजी भव्य दिव्य कृतज्ञता गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी कंधार शरद मंडलिक, लोहा तहसिलदार व्यंकटेश मुंडे, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, जिल्हा प्रशिक्षण विभागाच्या प्राचार्य जयश्रीताई आठवले, गोविंद हंगाळे , नायब तहसीलदार राम बोरगावकर, नायब तहसीलदार अशोक मोकले, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष मारोती कदम, शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, डायटचे अधिकारी चंद्रकांत धुमाळ, माजी गटशिक्षणाधिकारी मोतीराम राठोड, शिक्षणाधिकारी रविन्द्र सोनटक्के यांचे आई वडील, पत्नी ,भाऊ, बहीण, साडू सर्व नातेवाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते विद्येच्या आराध्य दैवता माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर सत्कारमूर्ती शिक्षणाधिकारी रविन्द्र सोनटक्के यांचा सपत्नीक लोहयाच्या पंरपंरेनुसार खारिक खोबऱ्याचा व पुष्पहार घालून कपडेरुपी भेट देऊन सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी निळा येथील जि.प. प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांनीनी भव्य स्वागत गित सादर केले तर पारडी येथील जि.प. प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांनीनी सुंदर लेझीम पथक सादर केले.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोहा तालुका शिक्षक समन्वय, बालाजी डफडे,मदन नायके सर,बी.वाय चव्हाण सर,बाबुराव फसमले,जि.एस मंगनाळे सर,विठूभाऊ चव्हाण सर,अशोक पाटील,पाराजी पोले सर,ज्ञानोबा घोडके,बालाजी बनसोडे सर,संतोष अंबुलगेकर सर,अशोक मोरे सर,राजेंद्र पाटील,मलकार्जुन जोडराणे सर, रमेश पवार सर,संतोष साखरे सर,आर.जी.वाघमारे सर,मुर्तुज शेख सर,जे.जी कांबळे सर, मंगल सोनकांबळे, शेख मुर्तुजा,अविनाश आवधूतवार सर,लहू पंदलवाड सर, परमेश्वर तिडके सर यांच्या सहित सर्व शिक्षक बंधु व शिक्षिका भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश पवार यांनी केले.