
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली दि.29. उरळगाव ता. शिरूर येथे लोकवर्गणीतून शिवशक्ती तरुण मित्र मंडळाच्या संकल्पनेतून आमदार ॲड.अशोक बापू पवार यांच्या आमदार फंडातून भव्य दिव्य श्री गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी श्री गणेश मूर्तीची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात व हडपसर येथील प्रसिद्ध अमर ब्रास बँड यांच्या पथकात मोठ्या उत्साहात करण्यात आली. पूर्ण गाव मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाला होता. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.
मूर्ती स्थापना व कलशारोहण प. पु. स्वामी कैलासगिरीजी महाराज( मठाधिपती – श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर मळेगाव थडी आश्रम कोपरगाव ) यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच ह.भ.प. पारस महाराज मुथा यांचे सुश्रा व्य कीर्तनाचा आनंद समस्त ग्रामस्थांनी घेतला. सोहळ्याच्या आयोजनासाठी शिवशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री शशिकांत कोकडे कार्यकर्ते निलेश पोपळघट, गजानन जांभळकर,अभय मुथा, अभय तातेड, रवी तातेड, मिलिंद ढमढेरे, प्रल्हाद नवले, सुमंत कोकडे, भाऊसाहेब कोकडे, निळोबा नवले, हरिभाऊ पोपळघट, सूर्यकांत कोकडे, बाळासाहेब कोकाटे, गोरक सात्रस,गोवर्धन घायतडक, तुळसीदास नवले, समीर गिरमकर, प्रमोद गिरमकर, अमोल वेताळ, किरण माने, अनुराग कोकडे, पप्पू वायदंडे, संजय जांभळकर, भानुदास चव्हाण, सचिन पाचुंदकर, मोहन सात्रस, बाबू आफळे, युवराज वायदंडे, अमोल होलगुंडे, मिनीनाथ नवले, रामदास गिरमकर, इंद्रभान चव्हाण, संतोष काका सात्रस, सोमनाथ बांडे, रामा गिरमकर, अशोक कोकडे, सोपान हरिहर, डॉ. प्रवीण कोकडे, सुनिता पोपळघट आदींनी अथक परिश्रम घेतले.
या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य रेखाताई बांदल, योगीराज समूहाचे अध्यक्ष राहुल दादा करपे,मा.आदर्श सरपंच सुनील दादा सात्रस, कार्यसम्राट मा. सरपंच प्रशांत सात्रस, मा सरपंच सारिका ताई जांभळकर, उपसरपंच स्वातीताई कोकडे,सरपंच अशोक चव्हाण, रघुनाथ भाऊ गिरमकर,मा उपसरपंच रामभाऊ बांडे, सोसायटी चेअरमन भरत आफळे, मा. ग्राम. स. निकिता ताई सात्रस, ग्राम. स. स्वप्निल गिरमकर,तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम महाराज गिरमकर, पोलीस पाटील सागर गिरमकर, तुकाराम गिरमकर सर, भानुदास सात्रस सर, हनुमंत काळे,राजू जाधव आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
याप्रसंगी आदर्श सरपंच सुनिल सात्रस यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की “नकळत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेलं हसू हेच तर खरं पुण्य आहे, कारण पुण्य ठरवून करता येत नाही. निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप तुमच्या पदरात पडते.. पुण्य म्हणजे सत्कर्माच्या ठेवीवर मिळणारे व्याज”..
या वेळी समस्त ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष श्री शशिकांत भाऊ कोकडे यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले.