
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड/प्रेम सावंत
गंगाखेड: येथे तहसीलदार कार्यालया मार्फत मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने होऊ घातलेल्या आगामी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये धनगर समाजाच्या उमेदवारांची साडेतीन टक्के आरक्षणाप्रमाणे भरती करण्यात यावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पवित्र पोर्टल मार्फत आगामी काळात तीस हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. आज पर्यंत झालेल्या वेगवेगळ्या भरतीमध्ये धनगर समाजाच्या उमेदवारांना साडेतीन टक्के आरक्षण प्रमाणे संधी मिळत नाही.
उलट धनगर समाजाच्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे दाखवून त्यांना डावलण्यात येते.
या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी व आगामी नोकर भरती प्रक्रियेमध्ये धनगर समाजाचे उमेदवार हे साडेतीन टक्के हक्काच्या आरक्षणाप्रमाणे घेण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्यासह गोविंद नारायणराव काळे,हनुमान बोबडे, योगिनंद मरगळ, अशोक आळसे, बळीराम भूसणर, अनंत बोबडे, संजय जाधव ,वैभव डाके, राहुल पारवे, विक्रमबाबा इमडे, बी टी साळवे, ज्ञानेश्वर शंबुले आदींची उपस्थिती होती.