
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
काँग्रेस कमिटीच्या लोहा शहराध्यक्षपदी तरुण तडफदार नेतृत्व माजी उपनगराध्यक्ष व्यंकटेश उर्फ सोनू संगेवार यांची निवड माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या संमतीने जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केली आहे. यावेळी नियुक्तीचे पत्र अशोकराव चव्हाण त्यांच्या हस्ते देण्यात आले.
काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करून काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार सर्व जातीधर्मातील व्यक्तींना सोबत घेऊन व पक्ष शिस्त पालन करून काम करण्याचे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.नियुक्ती पत्रावर जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांची स्वाक्षरी आहे.यावेळी माजी मंत्री डी. पी.सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे,काँग्रेस कमिटीचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्यासह अनेकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.काँग्रेसने लोहा शहराध्यक्षपदी सोनू संगेवार यांच्या रुपाने युवा नेतृत्वाला संधी
दिल्याने लोहा- कंधारचे आगामी राजकीय चित्र वेगळे पहायला मिळणार आहे. कमी वयात जनतेच्या मनातील ताईत बनून उपनगराध्यक्ष बनलेले व तेवढ्याच कमी वेळात लोकप्रिय बनलेल्या सोनू संगेवार यांच्या आजच्या निवडीने लोहा शहरात काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ‘युवा फॅक्टर’ चमकणार असल्याने लोहा पालिका व विधानसभेचे चित्र वेगळे पहायला मिळेल,हे ही मात्र तितकेच खरे!
काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल- व्यंकटेश उर्फ सोनू संगेवार,शहराध्यक्ष, काँग्रेस कमिटी,लोहा