
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली परंतु आज ही ग्रामीण भागातील रस्त्याचा विकास झाला नाही सिंचनाचा प्रश्न कायम आहे उद्योग धंदे नाहीत यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात या भागातील आजपर्यत चे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले हा मतदारसंघ माझी जन्म भूमी आहे या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी सूर्योदय मन्याड फाऊंडेशन च्या माध्यमातून मतदारसंघातील समस्यांची माहिती करून घेण्यासाठी व ती सोडवण्याचा प्रयत्न करत आहे सूर्योदय मन्याड फाऊंडेशन च्या माध्यमातून तरुणांची फळी उभी करून भाजपला बळ देण्याचे काम ही करणार आहे आज जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात 16 विद्यमान सरपंच यांचा समावेश आहे उमरज येथील संस्थांच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र पर्यटन विकास विभागाच्या वतीने 4 कोटी 36 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असे असताना काही पुढारी मंडळी सांगतात की तो निधी आम्ही मंजूर करून आणला माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांनी जर निधी मंजूर करून आणला असेल तर तो सिद्ध करून दाखवावा मी मतदारसंघात पाय ठेवणार नाही असा इशाराच भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी विरोधकांना दिला आहे .
यावेळी जिल्हा अध्यक्ष बालाजी परदेशी दता शेबाळे निळा चे सरपंच गजानन मोरे हिप्परगा सरपंच बालाजी पवार मुरबी चे सरपंच राम पाटील मुरबीकर दिलीप पाटील बोरगावकर माधव पांचाळ पांडू पाटील लोंढे तुळशीराम लुंगारे आदी मान्यवर उपस्थित होते नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील हराळे ,युवक तालुका अध्यक्ष चक्रधर फाजगे ,उपाध्यक्षपदी श्रीराम राऊत रामशेवर कदम द्यानेशवर प्रेमलवाड ,किशनराव ढगे नवनाथ हलगे ,अशोक टरके काळेश्वर देवके चक्रधर हंबर्डे विवेक भोपाळे दीपक कदम कंधार उपाध्यक्ष युवक उपाध्यक्ष व्यंकटराव राहेरकर जयवंत किडे सोशल मीडिया तालुका प्रमाख माधव पांचाळ यांच्या सह विविध आघाड्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे