दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा मतदारसंघातील राजकीय घडामोडीचा आराखडा तयार करुन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी सखोल चर्चा करण्यासाठी नांदेड जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर व शरद पाटील पवार यांच्यात तब्बल तीस मिनिटे बंद खोलीत चर्चा झाली.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या निवासस्थानी काॅग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
लोहा कंधार तालुक्यातील नव्याने पदाधिकारी यांच्या नियुक्त्या पक्ष वाढीसाठी ठोस उपाययोजना व कार्येक्रम घेऊन दिशा ठरवणे येणारी विधानसभा काबिज करण्यासाठी तब्बल तीस मिनिटे चर्चा झाली लोहा कंधार मतदारसंघातील वाडी ,तांडे विकासापासुन कोसो दुर आहेत त्यांचा आराखडा तयार करणे. पुढे येऊन ठप्प झालेली पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक ताब्यात घेण्यासाठी बुथ कमिट्या तयार करणे. घराघरात कॉंग्रेस मतदार तयार करणे, विविध योजनेचा आराखडा तयार करुन पक्षांचे ध्येय धोरणे राबवुन रणमैदानात उतरणे या विविध विषयांवर सखोल चर्चा केली.
यावेळी कंधार काॅग्रेसचे सोशल मिडिया प्रमुख सतिश देवकत्ते ,माजी नगरसेवक उत्तम महाबळे , जेष्ठ पत्रकार डि. एन.कांबळे पञकार सुरेश महाबळे , छायाचित्रकार विनोद महाबळे दैनिक चालु वार्ताचे उपसंपादक गोविंद पाटील पवार शिवराज पा पवार , रुक्मिजी पवार सह ,सुनेगाव,धावरी येथील कार्येकर्ते उपस्थित होते.