
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार/बारूळ येथील महादेवाच्या यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंना व भाविक भक्तांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पानपोई ची सुविधा उपलब्ध करण्यात आली यामुळे यात्रेला येणाऱ्या भाविक भक्तांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे पाणपोईचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव पाटील कळकेकर यांच्या शुभहस्ते आज दिनांक ०१/०४/२०२३ शनिवार रोजी करण्यात आले.यावेळी नांदेड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष शंकरराव नाईक, कंधार तालुका भाजपा उपाध्यक्ष एस पी जाधव, बारूळ ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी आनंदराव वन्नाळे, महात्मा गांधी तंटामुक्त समिती बारूळ चे अध्यक्ष रसूल पठाण ,श्रीराम पाटील गायकवाड, शिवराज स्वामी, बालाजीराव कुलकंडे ,संतोष पाटील कोल्हे ,शिवराज पाटील जाधव, धनाजी जाधव, बालाजी गायकवाड तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.