
दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): भारतीय जनता पक्षाचे आष्टी पं.स.माजी उपसभापती गोविंदराव खंडाळे यांची आर्वी येथील जागृती सोशल फोरम तथा काँग्रेसचे माजी आ अमर काळे तर्फे आयोजित सर्वधर्मीय सामूहिक सोहळ्यातील उपस्थिती एक राजकीय चर्चेला उधाण आले आहे निमित्त होते गोविंदराव खंडाळेच्या उपस्थितीचे गेल्या काही दिवसापासून भाजपच्या अंतर्गत कलहामुळे खंडाळे दाम्पत्य दुखावल्याची चर्चा प्रसार माध्यमात उमटली आहे पण त्यांचा पक्ष प्रवेश सुगावा अद्यापही प्रसार माध्यमांच्या हाती लागला नाही? मात्र गेल्या तीन दिवसापूर्वी आर्वी येथे काँग्रेसचे माजी आ.अमर काळे व मित्र परिवारातर्फे सामूहिक विवाह सोहळा साजरा झाला त्यात विविध क्षेत्रातील अनेक नवख्या चेहऱ्यासह गोविंदराव खंडाळेची उपस्थिती अनेक राजकीय कार्यकर्ते व नेत्यात चर्चेचा विषय बनली आहे गेल्या तीन पिढ्यापासून गोविंदराव खंडाळे भाजप पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे त्यांच्या पत्नी शितलताई खंडाळे सध्या मूळ गाव तारासावंगा येथील विद्यमान सरपंच आहेत असं राजकीय क्रियाशील खंडाळे दाम्पत्य भाजप पक्षापासून दुरावल्याची चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहे पण ते कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करतात किंवा नाही याची आर्वी विधानसभेत उत्सुकता शिगेला पोहोचत असतानाच मात्र काँग्रेस पक्षाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात गोविंदराव खंडाळेची उपस्थिती सामाजिक बांधिलकी अथवा कांग्रेस पक्ष प्रवेश घेण्याच्या दृष्टीने ? याचे उत्तर मात्र अद्याप पावेतो सापडत नाही एवढे मात्र की काँग्रेसच्या जुन्या जाणत्या वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यासह माजी आ.अमर काळे यांच्या सोबत प्रकाशित झालेले गोविंदराव यांचे छायाचित्र जाहीर असले तरी भेटी दरम्यान झालेल्या चर्चेची गुप्तता कायम ठेवण्यात काँग्रेसचे माजी आ.अमर काळे व भाजपाचे माजी उपसभापती गोविंदराव खंडाळे यांनी गोपीनियता बाळगली आहे येत्या काळात गोविंदराव कोणता राजकीय पवित्रा घेते यासह विविध क्षेत्रातील नवखी उपस्थिती याकडे राजकीय नेते कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे एवढे मात्र सत्य