दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : द्योगपती गौतम अदाणी यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आधी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आणि मग कर्ज फेडण्याचा दबाव, त्यानंतर आता ‘द केन’चा अहवाल आलाय. यातून कसे तरी बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतानाच आता बाजार नियामक सेबीने अदाणी समूहाच्या विदेशी व्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इकोनॉमिक्स टाइम्सने यासंदर्भात माहिती दिली आहे. SEBI आता अदाणी समूहाच्या किमान ३ विदेशी कंपन्यांसोबतच्या व्यवहारांची चौकशी करणार आहे. अदाणी समूहाने केलेल्या ‘संबंधित पक्ष व्यवहारां’ मध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही हेही सेबी तपासणार आहे.