
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:महाराष्ट्र कामगार कल्यान, मंडळ ललित कला भवन, नांदेड येथे दि. 31/03/2023 रोजी 10 व 12 वी गुणवंत कामगार पाल्य यांचा सत्कार कार्यक्रमआयोजीत करन्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष . श्रिनीवास भोसले सर दैनिक लोकमत जिल्हा प्रतीनिधि , नांदेड, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने श्री. भारत दुधमल (माजी मुख्यध्यापक) , विशेष अतिथी श्री. केळकर सर (माजी मुख्यध्यापक) प्रसाद धस (कामगार कल्यान अधिकारी गट नांदेड) , श्रीमती. मिनाक्षी कुलकर्णी (कनिष्ट लिपीक गट नांदेड) विलास मेंडके (केंद्रप्रमुख ललित कला भवन, नांदेड) हे उपस्थित होते. गुणवंत कामगार पाल्य यांचा मान्यवर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रू 5000/ चा प्रत्येकी धनादेश देवुन गौरव करन्यात आला. तसेच आई-वडिल यांचा देखिल गौरव करन्यात आला. या प्रसंगी कुमारी शिवानी काशेटवार या गुणवंत मुलिने आपले मनोगत व्यक्त करताना सिए होन्याची जिद्द बाळगली व कामगार कल्यान मंळाच्या विविध राबविन्यात येनार्या उपक्रमाबद्दल तीने मंडळाचे आभार मानले . तसेच वैष्णवी निटुरे इय्यता 10 ली च्या मुलीने देखिल मंडाळाच्या या उक्रमाबद्दल मंडळाचे आभार मानले याच बरोबर इत्तर गुणवंत कामगार पाल्य यांनी देखिल आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री. गजानन भोसीकर यांनी केले तर प्रस्ताविक प्रसाद धस यांनी केले आभार विलास मेंडके यांनी मानले. या प्रसंगी उपस्थित विश्वनाथ साखरे,साईनाथ राठोड, प्रसाद शेळके, मनीषा काळे, मंदा कोकरे, आरूना गिरी, उषा गवई, नामदेव तायडे, व्ही.बी. स्वामी व इतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होन्याकरिता मोलाचे सहकार्य केले.
गुणवंत विद्यार्थी नावे पुढील प्रमाने :-
इयत्ता 10 वी
1) निशा नामदेव सुर्यवंशी
टक्के 99.40%
2) हर्षवर्धन विनोदकुमार राऊत टक्के 98.80 %
3) वैष्णवी शिवाजी निटुरे
टक्के 98.40%
*इयत्ता12 वी*
*1) ओमकार रामेश्वर तिडके*
*टक्के 95.17*%
*2) शिवाणी पुरूषोत्तम*
*काशेटवार.*
*टक्के 92.17%
*3) सुयश सुभाषित इंदुरे*
*टक्के 90.%