
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अचलपूर) :-विश्वशांती बुद्ध विहार संस्थेतर्फे काकडा येथे दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पूजनीय भिक्षु संघ फुले शाहू आंबेडकर धम्म विचारक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की,काकडा येथे ओबीसी समाजाचे दानशूर व्यक्तिमत्व राजू बोंडे यांनी आपली दोन एकर जमीन बौद्ध धम्म विहारासाठी दान म्हणून दिली त्या जागेवर बौद्ध विहार बांधण्यात येत आहे.या करायला गती येण्यासाठी दिनांक १ एप्रिल व २ एप्रिल रोजी काकडा येथे धम्म परिषदचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुनील सदाशिव यांनी केले होते.तसेच या धम्म परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई येथील सेवानिवृत्त आयुक्त सुधाकर मोहोळ भोपाळ येथील माजी आय एस अधिकारी अकोटकर,डॉ.नीलकंठ यावलकर,त्याचप्रमाणे जपान येथील पूज्य भिक्खू यु.सी. व नागपूर येथील दीक्षाभूमी ट्रस्टचे अध्यक्ष पुज्य भिख्खू नागार्जुन सुरेश ससाई,पुज्य.भिख्यू आर्य सारिपत, पुज्य भिख्खू शीलरत्न,पुज्य भिख्खू धम्मपाल, पुज्य भिख्खू रतहणकर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी धम्मपिठावर उपस्थित होते.यावेळी पूजनीय भदंत सारी फक्त यांनी सांगितले की बौद्ध धम्म आचरणात आणल्या शिवाय कळत नाही.तेव्हा बौद्ध धम्माचे आचरण करावे.चार आर्य सत्य,दहा पारामीताचे पालन करावे व धम्मावर श्रध्दा निर्माण करावी तेव्हाच धम्म कळू शकतो.असे आपल्या धम्मदेशनेत त्यांनी सांगितले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्हा अध्यक्ष राजेंद्र छापाने,दादाराव सोनोने,धम्मप्रचारक भाऊराव वानखडे,रमेश सावळे,विजय रायबोले,इंजि.राजेंद्र डोंगरे,रामेश्वर डोंगरदिवे,रामेश्वर वानखडे,सुभाष तायडे,नामदेवराव गजबे,सुरेश इंगळे,लक्ष्मणराव इंगळे,विठ्ठलराव डोंगरदिवे,प्रभाकर वानखडे,भाऊराव भिसे,वसंतराव गायकवाड,ताराचंद चौरपगार,सुधाकर पाटील,समता सैनिक दलाचे अनिल इंगळे,तेलमोरे,मिलिंद तायडे,आदीत्य रायबोले,सौ.सुजाताताई रायबोले,साक्षी रायबोले,रमेश अवतारे,सौ.सुनिताताई छापाने,सौ.सुलभाताई वानखडे,जिल्ह्यातील बहुसंख्येने बौद्ध उपासक व उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.या धम्म परिषदेचे आयोजन विश्वशांती बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष सुनिल सदाशिव व जमीन दान दाते राजु बोंडे,दादाराव ढोके,ईश्वर वानखडे,काकडा येथील बौद्ध उपासक व उपासिकांनी केले आहे.