
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
गौरव जिजाऊ – सावित्रीच्या लेकीचा या उपक्रमांतर्गत दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंती दरम्यान समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व समाजासमोर आपला एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान व गौरव नवीन पिढीतील युवतींना प्रेरणा मिळावी म्हणून वितरित केला जातो त्याच उद्देशाने मागील वर्षापासून आझाद ग्रुप व दैनिक युवा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शोध घेऊन त्या महिलांचा सन्मान व्हावा आणि नवीन युवतींना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो… . त्या अनुषंगाने गणराज हॉटेल नमस्कार चौक नांदेड येथे दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी जिजाऊ – सावित्री रत्न पुरस्कार वितरण सोहळा अतिशय थाटामाटात संपन्न झाला. या वितरण सोहळ्यामध्ये सामाजिक , राजकीय शैक्षणिक , सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज कंधारच्या प्रा. लीलाताई राजेश्वरराव आंबटवाड व श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड येथून सेवानिवृत्त झालेल्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापिका पुरणशेट्टीवर व्हि.एन. यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांचा गौरव करण्यात आला. .या जिजाऊ – सावित्री रत्न पुरस्कार सोहळ्यासाठी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या माजी महापौर शैलजा किशोर स्वामी , भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई प्रतापराव पाटील चिखलीकर , छत्रपती शंभुराजे इंग्लिश स्कूल कंधार चे अध्यक्ष डॉक्टर मनीषाताई पुरुषोत्तम धोंडगे , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वच्छलाताई पुयड , गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविताताई संतोष मुरकुटे , श्री चक्रधर स्वामी सेवाभावी संस्थेच्या उपाध्यक्ष सुमनबाई अनंतराव शिंदे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत जिजाऊ – सावित्री रत्न पुरस्कार वितरण सोहळा अतिशय थाटामाटात संपन्न झाला. .याप्रसंगी या वितरण सोहळ्यासाठी निवड सल्लागार समिती म्हणून युवा राज्याचे संपादक अजित पाटील , प्रा.धाराशिव शिराळे , सहशिक्षक विनोद गवते , आझाद ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे , आझाद ग्रुपचे कार्यकारणी सदस्य दीपक रायफळे यांनी केले. . पुरस्कार वितरण सोहळ्या च्या यशस्वीतेसाठी भीमाशंकर मामा कापसे , ज्योतीताई भीमाशंकर कापसे , गणेश अनंतराव शिंदे , ऋतुजा गणेशराव शिंदे , आझाद ग्रुप व युवा राज्य यांच्या वतीने प्रयत्न करण्यात आले.