
दैनिक चालू वार्ता फुलवळ सर्कल प्रतिनिधी- नवनाथ वाखरडकर
कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात सूर्योदय म्हणून फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ दादा पवार यांची आशिया खंडातील एक नंबरची एमआयडीसी पिंपरी चिंचवड मध्येच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात कार्याची ओळख आहे एकनाथ दादा पवार हे एकमेव आपल्या कार्यामुळे त्यांनी महाराष्ट्रभर छाप मारली आहे एकनाथ दादा पवार यांची जन्मभूमी लोहा कंधार विधानसभा असल्यामुळे आपल्या जन्मभूमीचा विकास करण्यासाठी कंधार लोहा मतदारसंघातील विकास कामे करण्याचा त्यांनी ठामपणे निर्णय केला आहे आणि गेल्या काही वर्षात कंधार लोहा तालुक्याचा रखडलेला विकास आणि अविकसित कंधार चा अंधार पुसून उजेडात आणण्याचे काम करणार असे एकनाथ दादा पवार यांनी सांगितले आहे कंधार लोहा तालुक्यातील अंधार संपून कंधार लोहा तालुका विकासाचं अमृत हे सर्वसाधारण लोकापर्यंत पोहोचवणार असल्याचे एकनाथ दादा पवार यांनी सांगितले आहे कंधार लोहा या दोन्ही तालुक्यात सूर्योदय मन्याड फाउंडेशनच्या माध्यमातून ते आपले मोलाचे कार्य बजावत आहेत सूर्योदय मन्याड फाउंडेशन ची दमदार नूतन कार्यकारणी करण्यात आली . कंधार लोहा तालुक्यात सूर्योदय मन्याड फाउंडेशन शाखेचे शतक पूर्ण करत जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखासह, शाखाप्रमुख कंधार लोहा तालुक्यात 150 पदाधिकाऱ्यांची
निवड करण्यात आली यावेळी
या वेळी सूर्योदय मण्याड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ दादा पवार , फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष बालू भैय्या परदेशी ,भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ताभाऊ शेंबाळे , सुंदर सिंग जाधव ( फुपा), गजानन पाटील मोरे तालुकाध्यक्ष सूर्योदय मण्याड फाउंडेशन, भगवानराव घुगे , देविदासजी राठोड , मुरलीधर जी बोरगावकर, सरपंच सर्वश्री संजय जी पाटील(गौळ), गणेश पवार (मस्की), रामेश्वर पवार(मुरबी),बालाजी पाटील हिप्परगेकर(हीपरागा), ज्ञानू पाटील ताटे(पोखरी) , माधव जी वाघमारे (लिंबोटी), बालाजी गजले (निळा), रामेश्वर पाटील उपसरपंच शेलगाव, माणिकराव पाटील वाकडे सरपंच धवरी, आकाश थोरवट, ज्ञानेश्वर जी गीते सरपंच वंजारवाडी, व्यंकटराव रायकर सरपंच गंगनबीड, गणेश पाटील डांगे, गणेश मामा सोरगे, प्रल्हाद वारकड, पोलीस पाटील संदीप जी कोरडे, गंगाधर जी मैलारे, बाळू माने, अंगद होळगिर, आनंदराव मोरे, गोविंदराव पाटील मोरे यांच्यासह सूर्योदय मन्याड फाउंडेशनचे सर्व नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.