दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली, कोरेगाव भीमा ता.3 कोरेगाव भीमा येथील ओरिएंटल रबर कामगार संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली, या मध्ये सर्वानुमते नवीन कार्यकरणीचा ठराव पारित करण्यात आला. अध्यक्ष मन्हूण श्री धनाजी ढेरंगे यांची एकमताने निवड झाली.
या वेळी बोलताना श्री ढेरंगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सर्व कामगारांची एकजुटीची मोट बांधून सर्वांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटिबद्ध राहून कामगार व मॅनेजमेंट या मधील समतोल साधण्याचा, व कंपनीच्या भरभराटी बरोबरच कामगारांना ही योग्य मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे – श्री राजेंद्र म्हस्के, सोमनाथ मिसाळ, संजय सात्रस, अविनाश शिंदे, भाऊसाहेब ढेरंगे, सागर पाबळे आदींची निवड सुद्धा सर्वानुमते करण्यात आली.