
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून काल अहमदपुर शहरात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अहमदपूर शहरातील मुख्य रस्त्यावरून शिवाजी चौक, डॉ.आंबेडकर चौक, हनुमान मंदिर ,हिना लाॅज , तहसील कार्यालया समोरुन सावरकर चौक, बसस्थानका समोरुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात सावरकर गौरव यात्रेची समारोप सभा घेण्यात आली.सावरकराचे गाढे अभ्यासक प्रा.गोविंदराव जाधव यांनी सावरकर यांच्या जीवनावर व्याख्यान दिले.
मी सावरकर ,वंदे मातरम्, भारतमाता की जय फलक हातात घेऊन , यात्रेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकांनी मी सावरकर घोष वाक्य लिहिलेल्या भगव्या टोप्या डोक्यावर घातल्याने संपूर्ण शहर सावरकर प्रेमी झाल्याचे चित्र दिसून येत होते.
सदरील सावरकर गौरव यात्रेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे, माजी सभापती अँड.आर.डी.शेळके, माजी नगराध्यक्ष अँड.भारत चामे,क्राइस्ट स्कूल चे संचालक जिवणकुमार मद्देवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर, माजी नगरसेवक धनंजय जोशी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, डॉ.मधुसदन चेरेकर, गटनेते राहुल शिवपुजे, अँड.अमित रेड्डी, राजकुमार खंदाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष हणमंत देवकते, शिवसेनेचे शहरप्रमुख लक्ष्मण आलगुले, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, माजी पंचायत समितीचे सदस्य इतिराज केंद्रे, रामभाऊ नरवटे , बालाजी गुट्टे,माणीक नरवटे, अँड.निखील कासनाळे, संपन्न कुलकर्णी, मकरंद जोशी, गणेश हालसे, बालाजी बोबडे, विलास पाटील, पांडुरंग लोहकरे,तुकाराम सांगवीकर, दयानंद घाटोळ, प्रवीण डांगे,छोटू आय्या यांच्या सह भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते, सावरकर प्रमी जनता मोठ्या संख्येने सावरकर गौरव यात्रेत सहभागी झाली होती