
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
दि.६एप्रिल २०२३ला भोई समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व भोई समाजातील झुंजार युवा नेते श्री.प्रदीप नागोराव भनारकर यांची एकमताने विदर्भातील भोई समाजाचे एकमेव श्रद्धास्थान असलेल्या “हागोडबुआ तातापुर
देवस्थानच्या सचिवपदी” निवड झाल्या बद्दल प्रदीप भनारकर यांना भोई समाज बांधवांच्या वतीन शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी हागोडबुआ देवस्थानचे अध्यक्ष कैलास नान्ने, उपाध्यक्ष लिंबा शिवरकर ,कोषाध्यक्ष अमोल कार्लेकर, विश्वस्त सर्वश्री प्रकाश पारशिवे ,बापू पारशिवे, रमेश शिवरकर, काशीनाथ पारशिवे, बंडु नान्ने, लक्ष्मण करलुके, लक्ष्मण शिवरकर, शेखर नान्ने, रमेश शिवरकर ,अर्जून करलुके, संजय नान्ने ,सुरेश करलुके ,चंदू कामतवार, संतोष मढरे ,गजानन शिवरकर आदी पदाधिकारी व समाज बांधवांची या निवड प्रक्रियेमध्ये सहभाग होता.