
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आज दुपारचं रखरखत ऊन पडलं होतं. रोडवर आसपास सगळं काही सामसूम दिसत होतं. थोड्यावेळाने काही अंतराने एखादी गाडी ,एखादी स्कूटर रस्त्याने जात येत होती. ओशाळ नजरेने पहात होतो. थोड्यावेळाने माझी मुलगी भर दुपारी दीड वाजता क्लास करून त्या छोट्याशा व्ह्यानमधून उतरत होती. मी पाहिले ती सकाळी सहाला क्लासला गेलेली मुलगी आता कुठे दुपारी तिचा क्लास एक वाजता सुटला होता. अन् तिला खूप भूक लागली आहे चेहऱ्यावरून दिसत होतं. मी तिला विचारलं आत्ताच सुटला का क्लास! पत्नी म्हणाली ,अहो! निदान तिला पाय तर धुऊ द्या !थोडं पाणी पिऊ द्या! मीही तिच्या वाक्याने थबकलो थांबलो. मलाही लक्षात आले कोण्या सकाळी गेलेली माझी मुलगी आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा ती क्लास करते म्हणजे आजकालच्या मुलांना शिक्षणाने अक्षरशः मशीन करून टाकले आहे. केवळ अभ्यास अभ्यास आणि अभ्यास !
ती मात्र हात धुवून स्वयंपाक घरात जेवायला निघून गेली. पण मी मात्र माझ्या इतिहासा त माझ्या पूर्व काळात माझी शाळा कशी होती. यावर विचार करायला लागलो. माझे शिक्षक कसे होते. माझे कुटुंब कसे होते. शाळा सुटल्यावर तो एकच आवाज! प्रत्येक जण शाळेची घंटी वाजल्यावर कसं त्याला आनंद वाटत होता. त्याला सुटल्यावर घराची ओढ लागत होती.
सकाळी दहा ते एक आणि दोन ते चार अशी शाळा असायची. सरांची नजर म्हणजे आमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा धाक होता. सरांचा सन्मान म्हणजे आई वडिलांना इतकाच होता. आणि ह्या वयात सुद्धा सर दिसले तर आपोआपच आमचे हात सरांच्या पायाच्या दर्शनाकडे जातात. याचे कारण काय आधीचे शिक्षण आणि आताचे शिक्षणात बदल काय?
दुपारी जी शाळा सुटायची आम्ही घरी जायचं. घरी गेल्यानंतर रेडिओवर सुंदर अशी गाणी लागायची. आई स्वयंपाक करायलेली दिसायची. मायेने जवळ घेणारी आई ती वाट पाहत असायची. वाटत कोणी भेटलं तर हक्काने प्रेमाने गोंजारायचं. त्या हात फिरविण्यामागे एक प्रकारे आनंद मिळायचा आणि तो माणूस आपलाच आहे .असं नेहमी वाटायचं.
माणसानं माणसांमध्ये प्रेम होते. आस्था होती. माया होती .प्रत्येक मावशी स्वतःची मावशी वाटायची त्याचे घर आपले घर आहे असे वाटायचे.!
तो मामा म्हणजे सख्खा मामा आहे असा भास व्हायचा!
खरंच सांगू मित्रांनो! माझी शाळा ही माझीच शाळा होती. मी कितीही मोठा झालो. तरी मी कोट्यावधी रुपये कमाई केली .तरी मी त्या शाळेची सर कधीच विकत घेऊ शकत नाही. तो मिळालेला मित्रांचा सहवास, ती बेंचवर बसण्याची धडपड, मार्क मार्कांसाठी चाललेली चढाओढ, ना स्वार्थ कोणाविषयी ना द्वेष कोणाविषयी.
कोणता विद्यार्थी वर्गात आला नाही हे सरांना लगेच लक्षात यायचं. लगेच त्याला दुसऱ्या दिवशी उठवून छडीची घमघमाघम शिक्षा करायची. त्याला छडी मारली बाजूचे आपोआपच टाइड बसायचे. पण सरांनी छडी मारली म्हणून कधीच आम्ही घरी सांगितलं नाही. ना सरांविषयी कधी वेगळा विचारही डोक्यात आला नाही. ह्या वयात सुद्धा ते सर माझे आपले वाटतात. काय असेल ते शिक्षण, काय असेल ती शाळा ,काय असेल तो सहवास ,काय असेल ती प्रेरणा ,काय असेल ते प्रेम ,काय असेल ती भावना सर्व काही शाळा म्हणजे आत्मा वाटायचं. घरी कमी पण शाळेत कधी जावं असं वाटायचं.
ना त्या काळात मोबाईल, ना टी .व्ही, दुपारी पोस्टमन आला चुकून एखाद्याचे पत्र आलं तर ते केव्हा वाचावं आणि वाचलं तर ते जोरात वाचावं लागायचं. कारण त्यांना काय मजकूर पाठविला काय खुशाली पाठविली .यासाठी तळमळ वाटायची.
आज आमची शाळा ज्यावेळेस भरत होती. शाळा गच्च भरलेली असायची. शाळा मुलांची असल्यामुळे अजून जास्त मजा यायची. वर्ग सुटला की काय ?काही खोडकर विद्यार्थ्यांची मारामारी व्हायची, बेंचवर बसायची चढावर राहायची. वर्गात येण्यापूर्वी त्या काळ्या बोर्डवर कोणाशी तरी नाव आणि विचित्र चित्र त्याच्या नावे काढायची. मग काय वर्गात मजाच मजा त्याच्या नावाने टिंगल, टोपण नावाने अनेक जणांची नावे असायची. पण राग मात्र कोणालाच यायचं नाही. एकत्रित क्रिकेट, लेझीम, डंबेल्स, कबड्डी ,खो-खो एन.सी.सी स्काऊट चित्रकला ,हस्तकला काय काय सांगावं काय काय वर्णन कराव तेवढे थोडच आहे.
कारणही आजही आमच्या डोळ्यासमोर प्रत्येक विषयाचे शिक्षक सहज जरी आठवले तरीही जशास तशे डोळ्याच्या समोर दिसतात. काय ती शिक्षकांमध्ये ताकद असेल हे शब्दात वर्णन करणं शक्यच नाही. आणि आजही आमच्या मनात आमच्या सरांविषयी निश्चितच देवापेक्षाही दर्जा कमी बिलकुल नाही. कारण देव, शिक्षक ,आई ,वडील सर्व काही एक समान. शिक्षक म्हणजे आमचे प्राण होते. अन अजूनही आहेत.
सरांना भेटल्यानंतर सर जर विचारले काय चाललंय तुझं !कसा आहेस आता तू ,आहो! अजूनही आमची मुले लग्नाला आली तरी! आमचे सर म्हणजे सरच! सर म्हणजे दुधावरची साय! आमच्या जीवनाची ती माय!
पण मित्रांनो आम्ही मोठे झालो वये वाढली .मुलं आमच्या सोबतची लांब लांब गेली. काही सर आमच्या सोबत आहेत .काही सोडून गेली. पण सरांची आठवण त्या सरांचा सहवास ते दिलेले प्रेम आम्ही कधीच विसरू शकत नाहीत.
पण सर तुम्हाला नमस्कार तुम्ही दिलेले शिक्षण, तुमचा सहवास ,तुमचं प्रेम ,त्याकाळची शाळा, त्याकाळची शिस्त ,त्याकाळची वर्तणूक, बोलण्याची पद्धत ,तुम्ही फिरवलेला पाठीवरचा हात, तुम्ही मारलेली छडी, तुम्ही प्रेमाने जवळ घेतलेले . आज आम्ही कधीच कितीही मोठे झालो तर विकत घेऊ शकत नाहीत.
पण सर नमस्कार ,मला एक स्वप्न पडते सर आम्ही शाळेत पुन्हा कधी येणार! पण सर्व काही स्वप्नवत असताना सुद्धा शाळा दिसली की पुन्हा एकदा ती शाळा, तो वर्ग, ती भाषणे, परेड सावधान चा आवाज! अन् अथांग शांतता! शाळेत झालेली भाषणे. आणि जास्त भाषणांनी पोटात लागलेली भूक, नंतर नंतर येणारी झोप. सरांचा बाजूला बसून असलेला धाक, शाळेत टोचायला आलेली इंजेक्शन, शाळेला उद्या सुट्टी आहे म्हणून आलेले रजिस्टर! सर आता आम्ही सगळं काही मिस करतोय. सर आपले हे उपकार आम्ही शब्दाने तर सोडाच पण कितीही कष्ट केले तरी विसरणे अशक्यच! सर हात जोडून सलाम आपल्या कार्याला! धन्यवाद!
ओंकार लव्हेकर,
दैनिक चालू वार्ता, मराठवाडा उपसंपादक, फरांदे नगर नांदेड