दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
————————————————————–
पंचायत समिती लोहा या कार्यालयामध्ये आपल्या प्रदीर्घ सेवे नंतर वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले सेवा जेष्ठ केंद्रप्रमुख श्री डफडे बि.जी. साहेब व श्री पाटील टी. पी. साहेब यांना गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती लोहा यांच्या वतीने सेवापूर्तीच्या शुभेच्छा व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री सतीश जी व्यवहारे साहेब हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री सर्जेराव टेकाळे, श्री गुट्टे साहेब, श्रीमती सरस्वती अंबलवाड मॅडम, तालुक्यातील सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख सर्व केंद्रीय मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक, सर्व विषय तज्ञ, विशेषतज्ञ यांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी श्री पोले पि.डी. यांनी दोन्हीही केंद्रप्रमुखाच्या आपल्या अनुभव व्यक्त केले. श्री फसमले सरांनी दोन्ही केंद्रप्रमुखाची कार्यप्रणाली तसेच संघटन कौशल्य यावर विशेष प्रकाश टाकला. तर श्री मदन नायके सर यांनी लहानपणापासून सोबत राहिलेले व आलेले अनुभव आपल्या रसाळ वाणीत सर्वांसमोर मांडले. श्री सर्जेराव टेकाळे साहेब यांनी या दोन्हीही केंद्रप्रमुखांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव कथन केले.
अध्यक्षीय समारोप मध्ये तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री व्यवहारे साहेब यांनी या दोघांची कार्यप्रणाली व कार्य कुशलता यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमांमध्येच श्री संजय अकोले सर विषय तज्ञ व श्री चव्हाण राजू विशेषतज्ञ यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अध्यक्षीय समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नागोराव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बनसोडे सर यांनी केले.