
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
घुग्घुस/
घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मंगळवार, ११ एप्रिल रोजी सकाळी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, महात्मा जोतिबा फुले हे महिला शिक्षणाचे प्रणेते होते. महिलांना गुलामगिरीतून मुक्त केले. महिलांकरीता शिक्षण, जातीभेद निर्मूलनाची चळवळ राबविली.
यावेळी प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, मुस्तफा शेख, निशा उरकुडे, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, भारती परते, आकाश येलपुलवार उपस्थित होते.