
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
घुग्घुस
घुग्घुस ३५ वा स्वच्छता अभियान रोजी जेष्ठ नागरिक संघ व श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ तर्फे दर सोमवार सार्वजनिक, धार्मिक स्थळ, ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत ” स्वच्छता श्रमदान यज्ञ ” राबविण्यात येत आहे.
तसेच आज दि.१० एप्रिल २०२३ सोमवार रोजी तहसील कार्यालयासमोर नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती परिसरातील पूर्णाकृती पुतळा महामानव,भारतरत्न ड्रा.बाबासाहेब आंबेडकर १४ एप्रिल जन्मदिवस निमित्याने परिसरातील स्वच्छता,साफसफाई अभियान राबविण्यात आली.
यावेळी श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष श्री.मधुकर मालेकर, राजु नानाजी भोंगळे, नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समितीचे कोषाध्यक्ष अशोक रामटेके, माजी जिल्हापरिषद सदस्य चिन्नाजी नलभोगा,बहुजन महिला समाज आघाडी शहर अध्यक्षा सौ.उषाताई आगदारी,नंदुभाऊ ठेंगणे,मारोती पिंपळकर, शामराव बोबडे,जी.टी.जांभुळकर, भोजराज गोरे, वासुदेवराव इंगोले, संतलाल श्रीवास्तव, पुंडलिक धांडे, गंगाराम पा.बोबडे, नीलकंठ नांदे, भैयाजी वाघमारे, बालाजी बोधे,कवडू वाढई, जनार्दन गोबाडे, गुलाब महादेव थेरे, नीलकंठ गुलाब थेरे,किशोर बोबडे,जनाबाई निमकर,संध्याताई जगताप,माया मांडवकर,भारती सौदारी, उपस्थित होते.