
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना येथील कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शेषराव शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर लाचलूजपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात अटक केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली . तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन मिळाला असल्याने तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई कलम 110 ऐवजी कलम 107 प्रमाणे करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून 75 हजार लाच घेताना ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार यांच्या विरोधात कदीम ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला असल्याने संशयित पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी प्रतिबंधक कारवाई कलम 110 ऐवजी कलम 107 प्रमाणे करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांना एक लाख रुपयाची लाच मागितली. एक लाखाच्या लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर लाचलूचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली होती त्या त्यानुषंगाने लाचलूजपत अधिकाऱ्यांनी सापळा रचला.
शिंदे यांनी तक्रारदारांकडून 75 हजाराची लाथ पंचायत सक्षम स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सापळा पथकाचा संशय आल्याने लाचेच्या रकमेसह पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी सापळा पथकासह पथकास अडथळा निर्माण करून स्वतःच्या खाजगी वाहनाने फळ काढला सापळा पथकाने सुमारे 3 कि.मी पाठलाग करून त्याच पकडले आरोपी शिंदे यांनी लाचेची रक्कम पाठलागदरम्यान फेकून देत पुरावा नष्ट केला. सापळा पथकाने गाडीची जळती घेतली असताना गाडीमध्ये रोख नऊ लाख 41 हजार 590 रुपये व 250 ग्रॅम सोने सापडले. याबाबत कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचा प्रक्रिया सुरू आहे हे कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे उपाधीक्षक मारुती पंडित, पोलीस निरीक्षक नंदकिशोर शिरसागर, व नागरगोजे, व कांबळे यांनी पार पाडली.