दैनिक चालू वार्ता राजगुरूनगर ता. खेड प्रतिनिधी- मयुरी वाघमारे.
========================
राजगुरूनगर : – चांडोली ता. खेड, जि. पुणे, राजगुरूनगर. खेड तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे चांडोली ह्या गावाने संपूर्ण महाराष्ट्र पुढे एक आदर्श ठेवला आहे. सध्या संपूर्ण ठिकाणी महाराष्ट्रात ग्रामदैवताच्या यात्रा चालू आहेत. यामुळे गावा गावांत तमाशे, आर्केष्ट्रा असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम गावात होत असतात. त्या मुळे तरुणांचा दारू पिऊन धिंगाणा, मारहाण, भांडणे, पोलीस केस असे अनेक प्रकार घडत आहेत. त्या मुळे गावाचं नाव खराब होत आहेत. परंतु श्री. क्षेत्र प्रति पंढरपूर चांडोली येथे ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त मंदिरामध्ये आकर्षण फुलांची सजावट करून मंदिराचे सुशोभीकरण केले आहे तसेच गावा मध्ये तीन दिवस संगीत शिवचरित्र कथेचा कार्यक्रम ठेऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. विश्वविक्रमी शिवचरित्र कथाकार हरिभक्त पारायण बाजीराव महाराज बांगर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती महाराजांचा इतिहास सांगत तसेच तरुणांईला व्यसनापासून होणारे दुष्परिणाम यांवर मार्गदर्शन केले. काल दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता ग्रामदैवत महाराजयांच्या पालखी सोहळा मोठा उत्सहात पार पडला मोठ्या संख्येने या पालखी मध्ये भाविक उपस्थित होते. तसेच या यात्रे निमित्ताने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.