दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
महाराष्ट्र शासनाच्या घोषणेप्रमाने भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासकिय #आनंदाचा शिधा” किट्स च्या वाटपास चंद्रपूरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत, सहकारी स्वस्त धान्य दुकानातुन प्रारंभ झाला आहे. सदर योजना गुढीपाडवा या हिंदू नववर्ष पासुन तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर जयंती निमित्त या योजनेतंर्गत शिधा किटस् वाटप होणार अशा स्वरूपाची घोषणा राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली होती.उशिरा कां होईना या जनपयोगी योजनेचा फायदा कालपासून चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्य जनतेला होत असल्याने त्यांचेकडून समाधान व्यक्त केल्या जात असुन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रती लाभधारक कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे.