दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे फुले – शाहू – आंबेडकर युवा मंचातर्फे आयोजित महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त भीम बुद्ध गाथा ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते .या बहारदार कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्येक गीतावर ठेका धरला .
क्रांतीज्योती महात्मा फुले व ज्ञानसूर्य , विश्वरत्न ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आले होती .क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काल दिनांक ११ रोजी भीम बुद्ध गाथा प्रबोधनात्मक संदीप भुरे प्रस्तुत ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून व्यंकटराव पाटील गोरेगावकर जिल्हाध्यक्ष ग्रामीण भारतीय जनता पार्टी व सुरेश दादा गायकवाड बी आर एस पक्ष नांदेड यांची प्रमुख उपस्थिती लाभली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक वाय .सी .भुताळे तर उद्घाटक म्हणून शहरातील नामवंत डॉक्टर उत्तम इंगोले लाभले.
याशिवाय प्रमुख उपस्थितीत मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष श्याम वद्देवार तथा बी आर एस कार्यकर्ता केलास येजगे चंद्रकांत ठाणेकर , प्रा .उत्तम कुमार कांबळे भीमराव भाटापुरकर , सुभाष गायकवाड, अर्जुन गायकवाड संदीप भुताळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नगरवासीयांतर्फे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत कुमार वनंजे ‘ डी . डी वाघमारे जी . एन कांबळे, विशाल रावीकर , उमेश वाघमारे, माधवराव सोनकांबळे, शंकरराव मदनुरे , बालाजी कळसकर , डॉक्टर सचिन कांबळे , विवेक ईश्वरे , विशाल वनंजे , डॉक्टर मधु केरुरकर , यांचा विशेष सत्कार करण्यात आला तद् नंतर नगरातील तरुण मंडळींचा जाहीर वाढदिवस साजरा करण्यात आला .यानंतर संदीप भुरे दिनेश हेलोडे दिपाली हरणे यांच्या उडत्या चालीवरच्या भीम बुद्ध गीताने येथील उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्यांनी गायलेल्या गायनावर -गीतावर येथील तरुणाई मोठ्या प्रमाणात थीरकली .यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरसेवक सिद्धार्थनगर हॉटेल बेस गल्ली व परिसरातील नागरिक महिला करून तरुणी बालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होती
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जयपाल कांबळे व मार्गदर्शक अशोक लालू कांबळे यांच्यासहजयंती उत्सव समितीचेराहुल अंबुलगेकर कपिल आळंदीकर नितीन रावीकर अमर वानखेडे पवन सावंत व साहेबराव कांबळे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .