दैनिक चालू वार्ता भूम प्रतिनिधी-
भूम:- नवयूवकांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा ईतिहास अभ्यासता यावा यासाठी पोलिस निरिक्षक मंगेश साळवे यांनी जयंती निमित्ताने हजारो रुपयाची पुस्तके वाचनालयास भेट दिली.
शुक्रवार दि १४ एप्रिल २०२३ रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कसबा भीम नगर, पेठ भीम नगर, झोपडपट्टी, शिवशंकर नगर, लक्ष्मी नगर, राज्य परिवहन महामंडळ आगार, रिक्षा चालक-मालक संघटना , नगर पालिका चौक, गोलाई चौक , अण्णाभाऊ साठे नगर, तालुका खरेदी विक्री संघ, माजी सैनिक संघटना व भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात साजरी केली.
विशेष करून रिक्षा चालक मालक संघटनेच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शंकर खामकर, पत्रकार मुकूंद लगाडे, काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक इक्बाल पठाण, पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, नगर पालिका मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तात्या कांबळे यांच्या प्रमुख उपस्थिती होती , या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा इतिहास प्रत्येक नागरिकाला समजावा, प्रामुख्याने नवयूवकांना माहीत व्हावा यासाठी पोलीस निरीक्षक साळवे यांनी स्व खर्चातुन हजारो रुपये किमतीची पुस्तके मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्यकडे सुपूर्द केली.
दरम्यान भाजप पक्ष कार्यालयात जयंती साजरी करताना भाजपाचे जेष्ठ नेते बाळासाहेब क्षिरसागर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब वीर, अमोल बोराडे, भूम शहर अध्यक्ष शंकर खामकर, माजी नगरसेवक रोहन जाधव, श्रीपाद देशमुख, संतोष औताडे, मिडिया विभाग ता अध्यक्ष मुकूंद वाघमारे, अनिल डोके यांची उपस्थिती होती.
रिक्षा चालक मालक जयंतीच्या ठिकाणी अध्यक्ष संदीप जाधव, उपाध्यक्ष धम्मदीप लगाडे , प्रशांत शिंदे , सचिव पप्पू बगाडे, कोषाध्यक्ष अण्णा पायाळ, सदस्य नाना घुले , किशोर मिटकर, तात्या जावळे, अजय भोसले , अंकुश मोरे, प्रमोद माने, बच्चन गायकवाड, पत्रकार मुकुद लगाडे , शंकर खामकर आदींची उपस्थिती होती.
माझी सैनिक फेडरेशन कार्यालयामध्ये देखील
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले , यावेळी जिल्हा सरचिटणीस आदम शेख, उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष. रमेश बगाडे, अ.जा.शहर अध्यक्ष. प्रदिप साठे, शहर चिटणीस हेमंत देशमुख, माजी. नगराध्यक्ष अध्यक्ष संभाजी साठे, जेष्ठ नेते चंद्रकांत गवळी, विधिज्ञ संजय शाळू, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मेहबूब शेख, श्रीपाद देशमुख, सचिन बारगजे आदी उपस्थित होते.