दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर :- मौ. मोघा येथे प्रथमच हाकाच्या जागेत सर्वे नं 79 मध्ये मोघा येथील जयंती मंडळाने खूप खूप परिश्रम घेऊन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करत असताना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्यातले दुर्गुण कमी करण्याची गरज आहे असा जर आपण संकल्प केला तर खर्या अर्थाने जयंती साजरी केल्याचे समाधान होईल असे गावातील सरपंच सौ.जयश्री रमेश कदम यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या वेळी सौ.जयश्री कदम ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे रिपाईचे जिल्हासरचिटणीस पद्माकर कांबळे, माधव गुळवे, रमेश कांबळे, बालाजी कदम, भिमराव कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला गावातील सरपंच सौ.जयश्री रमेश कदम यांच्या हस्ते विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पंचशिल ध्वजारोहन करण्यात आले त्यानंतर त्रीशरण पंचशिल पठण करण्यात आले त्यानंतर त्यांनी समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या या वेळी मान्यवरांची मनोगते व शुभेच्छा पर भाषणे संपन्न झाली
या प्रसंगी सुष्मिता बाळासाहेब कांबळे,(उपसरपंच) बालाजी शंकरराव कदम तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल धोंडीराम कदम (माजी सरपंच) गोपीनाथ राजाराम तेलंगे ग्रा.पं.सदस्य ज्ञानोबा इरबा गायकवाड (माजी पोलीस पाटील) रमेश कदम, गणेश कदम रघुनाथ वाघमारे,व सर्व बौध्द उपासक आणि समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या विषयावर कृष्णा गायकवाड,स्नेहा गायकवाड म्हणाले की हल्ली युवक वर्गात व्यसनाचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी आजच्या दिनी मोघा गावातील सर्व युवकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करावा असे अवाहन केले या विद्यार्थ्यांनी भाषण केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कांबळे यांनी तर आभारप्रदर्शन सचिन वाघमारे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे उपाध्यक्ष दत्ता कांबळे, सदस्य पद्माकर कांबळे, संभाजी कांबळे,अनिल गायकवाड,अंगद गायकवाड, शिवाजी वाघमारे,लक्ष्मन कांबळे,मरीबा कांबळे, सुर्यकांत कांबळे,व पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला