दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा 2023 पूर्व तयारी बैठकी निमित् आज देगलूर येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवा- अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना ता.शाखा देगलुर जि.नांदेड तर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस शिवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वैजनाथ अण्णा तोनसुरे,माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसेटवार,माजी नगरसेवक व भाजपा शहराध्यक्ष अशोक गंदपवार, शिवा कर्मचारी जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील बिरादार ,शिवा कर्मचारी तालुका अध्यक्ष विश्वनाथराव पाटील सर,शिवा संघटना शहराध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर शिवा तालुका अध्यक्ष अशोक मजगे,शिवा महिला आघाडी रेखाताई देवाडे, संजय अण्णा तोनसुरे,उमाकांत अप्पा स्वामी, प्रसिद्धीप्रमुख पटणे ,रामलिंग स्वामी मंडगीकर,शितल भालेराव सर,मुरुडे सर,माधव येसगे,शिवराज वंटे,शिवराज मुंडकर,अंकुश साखरे,प्रकाश भवरे आदी सर्व शिवा संघटनेचे मावळे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.