
दैनिक चालु वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती , जमाती आयोग माजी अध्यक्ष न्यायमूर्ती सी.एल.थुल यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सहयोग नगर नांदेड येथील मातोश्री रमामाता बौद्ध विहार येथे मंगळवार दिं .१८/४/२०२३ रोजी सकाळी अकरा वाजता व्याख्यान आयोजित केले आहे. महाविहार परिवार नांदेड , रमामाता महिला मंडळ , बौद्ध विहार समिती , सहयोग नगर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .तरी सदर कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध बांधवांनी, विद्यार्थी कर्मचारी व आंबेडकरारी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविहार परिवार नांदेड तर्फे आयुष्यमान साहेबराव पुंडगे , इंजिनियर यशवंत गच्चे , बी.जी पवार, रमेश कोकरे, राजेश बि-हाडे, अशोक गोडबोले, एडव्होकेट भीमराव हाटकर, ज्येष्ठ नागरीक अभिमन्यु होवाळ साहेब तसेच रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा उपासिका जयाताई सुर्यवंशी यांनी केले आहे.