दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
दि 16 एप्रिल (कोथरूड पुणे )
आपल्या मुलाबरोबर सुट्टीत चित्रपट पाहणे हे उच्चवर्णीय असो किंवा मध्यमवर्गीय असो याचे नियोजन केलेले असते. मात्र बाल आश्रमातील किंवा अनाश्रमातील ईतर संस्थातील ,अंध, निराकार ,अनाथ राहणाऱ्या मुलांसाठी सुट्टीत चित्रपटगृहात जाऊन मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचे दिव्यस्वप्न असतं ही भावना ओळखून ही मावळचे युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते देवा गायकवाड यांच्या संकल्पनेतून नुकताच प्रदर्शित झालेला घर, बंदुक,बिर्याणी हा नागराज मंजुळे यांचा चित्रपट मुलांना दाखवण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले, मुलांमध्ये आनंद निर्माण व्हावा त्यांच्या मनावरती चित्रपट पाहून समाधान निर्माण व्हावे या हेतूने हा कार्यक्रम केल्याचे गायकवाड यांनी सांगितले त्यानुसार या कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले.
बाल आश्रमातच राहूनच आपले उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या अनाथ मुलांसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अमृता करवंदे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले, हे चित्रपट पाहण्यासाठी पुणे अंध मुलांची शाळा ,सेवा मित्र मंडळ, सेंड फ्रीसपी होम कन्या शाळा,सूर्यदेव फाउंडेशन बचपन फाउंडेशन तसेच जिजाऊ फाउंडेशन या संस्थातील अंध, अनाथ, निराधार जवळपास 350 मुलांनी चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला .
आण्णा जोगदंड म्हणाले कि “एक दिवस आनंदाचा “या उपक्रमार्गत चित्रपट मुलांना दाखवण्याचा उपक्रम घेण्यात आला. चित्रपट चालू होण्यापुर्वी सर्वानी उभे राहून राष्टगीत गायले व मध्यान्ह मध्ये मुलांना खाऊ वाटप केले,त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते पाहून आम्हा सर्वाना खूप आनंद झाला.
विकास कुचेकर म्हणाले कि आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे आणि आपण ते दिले पाहिजे या उदात्य भावनेतून आम्ही हे सामाजिक काम केले.
मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलण्यासाठी स्वतः अभिनेता आकाश ठोसर हेही या ठिकाणी उपस्थित राहून मुलांशी संवाद साधून त्यांना चित्रपटाबद्दल माहिती दिली प्रत्यक्ष कलाकाराबरोबर संवाद झाल्यामुळे मुले खूप आनंदी झाली होती, टाळया वाजवून स्वागत करत होती तर अभिनेत्या बरोबर सेल्फीचा आनंद चित्रपट ग्रहात घेत होत होती.
यावेळी अभिनेता आकाश ठोसर यांनी सांगितले की एवढ्या मोठ्या संख्येने आमचा चित्रपट अंध, निराधार, अनाथ मुलानी पाहिल्याने आम्हाला खूप आनंद झाल्याचे आकाश ठोसर यांनी सांगितले व आयोजकाचे आभार मानले.यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे संस्था अध्यक्ष विकास कुचेकर व पिंपरी चिंववड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी मध्यान्ह मध्ये त्यांना संघर्ष मानवी हक्काचा पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्येकर्ते देवाभाऊ गायकवाड, अमृता करवंदे, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महाराष्ट्र सचिव,आण्णा मंजुळे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, महीला शहराध्यक्षा मीनाताई करंजावणे, उपाध्यक्ष विकास शहाणे,कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी सा.का.आकाश आखरे,लखन वाघमारे, गणेश चाटे,सागर ,पवार, शिरीष मोहीते,ईत्यादी सह अनेक संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.