दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: तालुक्यातील मौजे धारासुर येथे जागतिक वारसा दिना निमित्त मंगळवार दिनांक 18 एप्रिल2023 रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचनालय महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत दिनांक 16 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान जागतिक वारसा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या निमित्त सांस्कृतिक कार्य विभाग व पुरातत्व विभाग नांदेड आणि तुळशिरामजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धारासुर तसेच धारासुर येथील ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त
राज्यसंरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर तसेच मंदिर परिसरा मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये तुळशीरामजी पाटील महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर.पी राठोड सर, गाढवे सर, खंदारे सर, शिसोदे सर, स्वामी सर, कदम सर यांच्यासह तुळशीरामजी पाटील महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच गुप्तेश्वर मंदिर बचाव अभियान संघर्ष मोहीम समितीचे सदस्य निवृत्ती कदम यांच्यासह धारासूर येथील ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहीम अभियाना मध्ये सहभाग नोंदवला.