दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी – ज्ञानेश्वर साळुंके
अंबड,ता.19(बातमीदार):अंबड तालुक्यातील धनगरपिंपरी येथील सर्वसामान्य कुटूंबातील संदिप कचरे या तरुणाने आपल्या घरच्या हलाकीच्या परिस्थितीवर मात करत मोठ्या कष्टाने व विशेष परिश्रम घेत पोलीस भरतीची दिवसरात्र तयारी करून पोलीस होण्याचे अखेर स्वप्न साकार केले आहे.सध्या अकोला येथील पोलीस दलात संदीप कचरे यांची निवड झाली आहे.याबद्दल
ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार केला.याप्रसंगी सरपंच सरस्वती पवार, उपसरपंच विलास कचरे ॲड.संदिप नरोडे,रामेश्वर सावंत,ग्रामपंचायत सदस्य भानुदास आरगडे,प्रदीप इंगळे कृष्णा वरे,किशोर काळे,योगेश कचरे,ज्ञानेश्वर बहुले,कृष्णा पवार, ज्ञानेश्वर शेळके,कृष्णा शेळके,रामेश्वर टोंपे,संतोष टोंपे,परमेश्वर आरगडे, राहुल नरोडे,सचिन वरे,शिवाजी नरवडे,दत्ता राकुसले व गांवकरी उपस्थित होते.