दैनिक चालु वार्ता रायगड म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा -भारती विद्यापीठ बंदरकाठा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री गोरख सिदू घुटुकडे यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा -भारती विद्यापीठ बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगाव – ताम्हाणे येथे पारपडला या वेळी मान्यवर श्री मेकडे, डॉ मेहता, श्री जगनाथ तांडेल सरपंच, आर.एम. जाधव, श्री चव्हाण, श्री दुरे ग्रामस्त, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी श्री घुटुकडे सर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला त्यांची सेवा ही खूप मोठी येणाऱ्या पिढी साठी ची शिदोरी आहे श्री घुटुकडे म्हणजे एक चालत बोलत सर्वश्री सेवा भावाचा संमिश्र संगम आहे ते फक्त काही जणांना ते लाभते, सर म्हणजे चालता बोलता दवाखाना अनेकांच्या असणाऱ्या शाररिक समस्यांवर नक्कीच सर त्यावर उपाय करणार त्यांचा बोलके पणा हा सर्वाना लोभ देणारा होय त्यांची सेवा, त्यांचे कार्य खूप चांगले लाभले विद्यार्थी प्रिय शिक्षक असे नाते निर्माण झाले. या मान्यवरांनी सर यांच्या कार्यावर भरभरून बोलले कार्यक्रमाचे प्रस्थाविक श्री शिवरकर यांनी केले तर मनोगत श्रीमती द्वारका मॅडम, विद्यार्थी याने व्यक्त केले. श्री घुटुकडे यांच्या सौभाग्यवती, कन्या पूनम हितचिंतक शिक्षक वर्ग श्री बोबडे, श्री लहारे ,वसावे, दलाल भाऊ, देंडे, गणेश पाखरे, शितकर मॅडम मीनाक्षी जैन पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार मीनाक्षी जैन यांनी व्यक्त केले