दैनिक चालु वार्ता भूम प्रतिनिधि-
भू म:-पंडीत जवाहरलाल नेहरू ऊर्दु प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहारामध्ये भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार येथील असिफ लायकअली जमादार यांनी दि. २८ रोजी गटशिक्षण अधिकारी राहुल भट्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील पंडित जवाहलाल नेहरू उर्द प्राथमिक शाळेत विद्यार्थी यांना शासनाकडून मिळणाऱ्या शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार होत असून पोषण आहारासाठी दिलेले धन्य बेकादेशीर बाजारात विक्री केले जात असून विद्यार्थी यांच्यासाठी आलेला आहार संस्था पदाधिकारी नातेवाईक संगणमत करून बेकायदेशीर विक्री करत असून बनावट पावत्या तयार करून परस्पर धान्य विक्री होत आहे. या शाळेची तत्काळ चौकशी करावी अन्यथा लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करण्याचा इशारा अशी असिफ जमादार यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिला आहे.