दैनिक चालु वार्ता भूम प्रतिनिधि-नवनाथ यादव
भूम:- राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाचोरा येथील जाहीर सभेत ब्राम्हण समाजाबाबत आपशब्द वापरल्याने याचा ब्राम्हण संघटना भूम यांच्या वतीन जाहिर निषेध करत त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी करत दि २७ रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन द्वारे देण्यात आली.
याबाबत निवेदनात असे म्हटले आहे की, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि २३ एप्रील रोजी पाचोरा येथील जाहीर सभेत ब्राम्हण समाजाबाबत जानवे आणी शेंडीची भाषा केली. शेंडीची राजकारण चालु देणार नाही. त्यामुळे ब्राम्हण समाजाच्या भावणा दुखावल्या आहेत हिंदू -हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे देशात आदर्श व्यव्तीमत्व होते.त्यांचे चिरंजीव म्हणुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकड पाहिल जात परंतू याच उद्धव ठाकरे यांच्याकडून समस्त सनातन हिन्दू धर्माबाबत भावणा दुखवणारी भाषा केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध भूम ब्राम्हण संघटना व समस्त समाज बांधवांनकडून केला आहे . याबाबत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात भूम तालुका ब्राम्हण संघटना अध्यक्ष सुधिर देशमुख , शहर अध्यक्ष विधीज्ञ संजय शाळु , हेमंत देशमुख , सचिन बारगजे , के डी मुसांडे , विजयकुमार देवडीकर , बावीकर , भगवंत देशमुख ,अमोल तुळशी , प्रशांत देवडीकर , रविंद्र बुरटे ,राजाभाउ भाग्यवंत , श्रीकांत वासकर , अँड बावीकर आदीच्या स्वाक्षरी आहेत.