दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- स्व.दत्ताजी भाले स्मृती प्रतिष्ठान उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार जि.नांदेड संचलित स्वामी विवेकानंद वस्तीगृहाच्या नुतन वास्तुचा ( ईमारत) भूमिपूजन व समता मा. व.उच्च मा.विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक तथा या पंचक्रोशीतील आदर्श व्यक्ती … आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मा.श्यामसुंदरराव जहागीरदार गुरुजी यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त माजी,आजी विद्यार्थी व गावक-यांच्या वतीने आभिष्ठचिंतन सोहळा दि. १ मे २०२३ रोज सोमवारी दुपारी ४ वाजता श्री. शिवमंदिर सभागृहात मंगलमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मंगलमय सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष,लोकाभिमुख नेतृत्व मा.खा.प्रतापराव पाटील चिखलीकर (नांदेड लोकसभा मतदारसंघ खासदार ) , हे राहणार असून या कार्यक्रमाचे उध्दघाटक म्हणून मा. डॉ. सुधीरजी कोकरे ( मा. जिल्हा संघसंचालक रा.स्व.संघ नांदेड ) यांच्या शुभ हस्ते होणार आहे यावेळी श्री १०८ ष.ब्र.ष.प. डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज ( गणाचार्य मठ ,मुखेड ) यांचे आशीर्वाचन होणार आहे. तर या मंगलमय कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.आ.राम पाटील रातोळीकर ( विधान परिषद सदस्य ) मा. रामदास पाटील सुमठाणकर ( १५ हिंगोली लोकसभा प्रभारी) मा.आ. राजेशजी पवार ( आमदार नायगाव विधानसभा ) मा.एकनाथजी पवार ( गटनेते पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पुणे ) यांच्या सह आदी मान्यवर मंडळी व कार्यकर्ते ,आजी- माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.तरी पंचक्रोशीतील आजी , माजी विद्यार्थी , व नागरिकांनी वरील मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी , असे आवाहन आजी , माजी , विद्यार्थी ,स्वामी विवेकानंद वसतीगृहातील विद्यार्थी कर्मचारी ,व समता विद्यालय आणि समस्त गांवकरी मंडळी यांनी आव्हान केले आहे.