दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:नवोदय विद्यालय समिती विभाग, पुणेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारी, २९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० दरम्यान नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीसाठी प्रवेश परीक्षा पार पडली. ही परीक्षा शहरातील ३ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. त्यामध्ये एकूण ८५८ विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज केले होते, त्यापैकी ७९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर एकूण ६७ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले.
परीक्षा केंद्रांमध्ये येथील मानव्य विकास विद्यालयात एकूण २८८ पैकी २६७ परीक्षार्थी उपस्थित राहिले, तर २१ विद्यार्थी गैरहजर राहिले. येथे केंद्र संचालक म्हणून शरद हांद्रे यांनी काम पाहिले. दुसरे परीक्षा केंद्र असलेल्या पु. गोळवलकर गुरुजी विद्यालयात२८२ परीक्षार्थीपैकी २६४ परीक्षार्थीनी परीक्षा दिली तर १८ विद्यार्थी गैरहजर राहिले. येथे बाळासाहेब केंद्रे यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले. शहरातील सप्तगिरी पोदार लर्न स्कूलमध्ये २८८ पैकी २६० परीक्षार्थी उपस्थित राहिले तर २८ विद्यार्थी गैरहजर राहिले. येथे ए.डब्लू. मुजावर यांनी केंद्रसंचालक म्हणून काम केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदय विद्यालयाचे एस. आर. शेजूळ यांनी काम पाहिले. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी देगलूरचे गटशिक्षणाधिकारी पंजाबराव सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी एम. के. मणियार, शिक्षण विस्तार अधिकारी डी.के. तोटरे, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एच. झंपलवाड, मोतीलाल साबणे यांनी प्रयत्न केले.