दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी.
स्पर्धेच्या युगात गरीब,दुर्बल वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे नर्सरी, एलकेजी, युकेजी असे गुणात्मक शिक्षण जि.प. मुख्याध्यापकाच्या नियंत्रणाखाली शाळेतील अंगणवाडीतून देण्यात यावे. यासाठी अंगणवाडी सेविकांना (मॅडमना) दर्जेदार ट्रेनिंग देण्यात यावी.असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित ग्रामविकास अधिकारी कोकणे साहेब, उपसरपंच अनिल पाटील, ग्रा.प.सदस्य डुकरे सर, नागेश बक्कनवार, मारजवाडे साहेब, प्रहार संघटनेचे सुरेश बक्कनवार, बालाजी तुरुकवाड, बजरंग कोरेवाड, शिवराज सुंके, साईनाथ आगलावे,संतोष कदम सर्वांच्या वतीने निवेदन देण्यात आले.