दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक व मतमोजणी प्रक्रिया नुकतीच पार पडली.
या निवडणुकी मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा मताधिक्याने विजय झाला.
विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या संपर्क कार्यालयावर भव्य सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक 30 एप्रिल 2023 रविवार रोजी करण्यात आले होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक साहेबराव(आबा) भोसले, भगवानराव सानप, नारायणराव शिंदे (देशमुख), तुकाराम भालके, सुशांत चौधरी, अभय कुंडगीर, संतोष जाधव गौंडगावकर यांचा विष्णू मुरकुटे यांच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, शिक्षक नेते बाळासाहेब राखे, सिद्धेश्वर आंधळे, सुशील पाळवदे, शंभूदेव मुंडे, कांतू अण्णा मुरकुटे, हर्ष आंधळे, जगन्नाथ आंधळे, गोविंद मुंडे, माऊली नागरगोजे, परशुराम, कृष्णा आंधळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.