दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा- सुरेश ज्ञा. दवणे..
जालना मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व निर्माण करीत १८ पैकी १२ जागा जिंकल्या. भाजप व शिंदे गटाला केवळ सहा जागेवर समाधान मानवे लागले. मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत२२४३ पैकी २१४६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क या निवडणुकीत बजावला आहे.
महाविकास आघाडीचे ए.जे. बोराडे, गोपाळराव बोराडे, पंजाब केंधळे, अण्णासाहेब खंदारे, संतोष वरकड, सचिन राठोड, कौशल्या तुकारामजी बोराडे, सौ स्वाती दत्तात्रय काकडे, ज्योती सरकटे, ग्रामपंचायतमधून सुनिता खरात, बाबाराव राठोड, दत्तप्रसाद बनसोडे, भाजप – शिंदे गटाचे माजी सभापती संदीप गोरे, प्रल्हादराव बोराडे, पंजाबराव बोराडे, व्यापारी मतदारसंघातून सतीशराव निर्वळ वैजनाथ बोराडे तर हमारी मापाडी मतदारसंघातून मुस्तफा पठाण निवडून आले आहेत.
अत्यंत अटीतटीची ही निवडणूक होती, या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीला पूर्णपणे कौल दिला. निकालाची घोषणा होतात महाविकास आघाडी कडून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. मतदारांनी शांततेत मतदान केले यात ९४.७८ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट,काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली होती या विरोधात भाजप शिंदे गटाने ही निवडणूक लढवली…….
🎆•ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विजय आहे —
ए.जे. बोराडे. शिवसेना जिल्हाप्रमुख
🎆•मंठा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी दिलेला हा कौल असून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही हिताचे निर्णय घेणार गोपाळराव बोराडे. ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस
🎆•कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हा राज्यासाठी सत्तांतराचा विषय असून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता बदल घडवून आणणार — माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया
🎆शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हा राज्यासाठी सत्तांतराचा नांदी आहे
पंकज बोराडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष