दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अमोल आळंजकर
गंगापुर प्रतिनिधि – लासूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितिवर भाजप आमदार प्रशांत बंब व शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रा.बोरणारे सर यांनी १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवत बाजार समितिवर वर्चस्व प्रस्थापित केले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही पॅनलचा दारून पराभव केला आहे.त्यांना सोसायटी मतदार संघातून दोनच जागा मिळवल्या आहे.तर कॉंग्रेसला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. आमदार प्रशांत बंब व गंगापुर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती,यात आमदार प्रशांत बंब यांनी वैजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा.रमेश बोरणारे यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवली तर डोणगावकर यांनी राष्ट्रवादी सोबत युती करून ही निवडणूक लढवली ऐनवेळी माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे चिरंजीव तथा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक किरण पाटील डोणगावकर यांनी निवडणूकीच्या रिंगणात त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उतरवले होते. यात त्यांना सपशेल अपयश आले.
भाजप -शिवसेना ( शिंदे गट ) यांचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. संभाजी जगताप,अशोक जगताप,मनीष पोळ,आप्पासाहेब जगदाळे,विलास सोनवणे,संजय केरे,संगीता चिंदे,ज्योती कुर्हाडे,शेषराव जाधव, ग्रामपंचायत मतदार संघ – संतोष जाधव पाटील,रितेश मुनौत,अनिल चव्हाण, सुरेश जाधव,तर व्यापारी मतदारसंघातून रतिलाल मुनौत, महेंद्र पांडे,हमाल मापारी- सुनील पाखरे हे विजयी झाले आहेत. त्याचप्रमाने शिवसेना ( ठाकरे गट ) – राष्ट्रवादी यांचे दोन उमेदवार विजयी झाले आहे.सहकारी संस्था दिनेश मुथा व नंदकुमार कुकलारे अशी त्यांची नावे असुन व्यापारी मतदारसंघातून प्रकाश मुथा व सुबोध मुथा यांनी अपक्ष म्हणून मिळवला आहे.यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला