दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.1 आज ६४ व्या महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने शाळेत विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. निमित्त होते गुणवंत विद्यार्थी उपाध्यक्ष चषक स्पर्धेतून वर्षभराच्या दहा निकषांच्या आधारे 100 गुणांच्या मूल्यमापनातून एक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची निवड करण्यात आली. चैतन्य बाळासाहेब लंगडे इ. ७ वी व कार्तिकी दत्तात्रय महाजन इ. ६ वी या विद्यार्थ्यांनी यावर्षीचा हा बहुमान पटकावला सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच यावर्षीचा आदर्श वर्ग – फिरता अध्यक्ष चषक पटकावला तो इयत्ता ४ थीच्या वर्गाने. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वर्ग शिक्षिका सौ. जयश्री तानसेन करपे व सर्व विद्यार्थ्यांनी हा चषक स्वीकारला. यावेळी वर्ग शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच सामान्यज्ञान उपक्रमांतर्गत सामान्यज्ञान लेखी परीक्षेमधील प्रथम तीन क्रमांक व वर्गनिहाय प्रथम क्रमांक यांना रोख स्वरूपाची बक्षीसे देण्यात आली.
सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा उपक्रमांतर्गत प्रथम तीन क्रमांकांना रोख स्वरूपाची बक्षीसे व सहभागी वर्गांना वही भेट देण्यात आली. यावेळी गावचे प्रथम नागरिक व ग्रामपंचायत गोलेगावचे सरपंच दिलीप पडवळ, उपसरपंच निलेश बांदल, माजी पोलीस निरीक्षक नारायण वाखारे साहेब, पोलीस पाटील संदीप भोगावडे, ग्रामपंचायत सदस्या सारीका इंगळे, पोलीस दलातील नितीन चव्हाण, मा. सरपंच रामचंद्र वाखारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप भोगावडे, उपाध्यक्षा सुलभा पडवळ, समिती सदस्य मच्छिंद्र कारंडे, प्रवीण खरबस, मा. उपसरपंच विकास वाखारे, दत्तात्रय महाजन, बाळासाहेब लंगडे व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
शाळेमध्ये राबविलेल्या इतर उपक्रमांमध्ये सहभागी असणाऱ्या व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बक्षीसे देण्यात आली.
यावेळी शाळेतून बदली झालेल्या वाळके मॅडम व आबुज मॅडम यांचा त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल सन्मान करण्यात आला.