दैनिक चालु वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
====================
निलंगा:30/04/2023 मौजे शिऊर येथे 30 तारखेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीचे अधेक्ष मारोती सोमवंशी आणि सचीव दिलीप बनसोडे यांनी जयंती करण्याची जबाबदारी स्वीकारून जयंतीचे कार्य पार पाडले. जयंती उत्साही आणि शांततेत पार पडली. डॉ आंबेडकर चौकात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले आणि सायंकाळी 5 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्राची भव्य मिरवणूक DJ च्या तालात पूर्ण गावातुन काढण्यात आली. यात गावातील सर्वधर्मीय वेक्तीने सहभाग घेला तर लहान थोर वेक्तीने वेगवेगळ्या भिम आणि शिव गीतावर वेगवेगळे नृत्य सादर करून आपला आनंद व्यक्त केला. हि मिरवणूक कशाचेही गाल बोट न लागता जवळपास चार तास चालली. जयंतीचे औचित्य साधून गावचे अन्नदाता म्हणून ओळखले जाणारे शिवाजी आष्टुरे यांनी भव्य अन्नदान केले. जनतेचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे दिनकर बिरादार आणि कुमार पाटील धनेगावकर यांनी जयंती मंडळास आर्थिक सहाकर्य व मार्गदर्शन करून जयंती महोत्सवात सहभाग घेतला. जयंती सुरळीत पार पाडण्यासाठी विश्वजित बनसोडे, सुग्रीव कांबळे, भागवत पिटले, दिपक तुगावे, सुधाकर सूर्यवंशी, नरसिंग गजाकोष, बालाजी जढाळे, रौफ सय्यद, इरफान सय्यद, ज्ञानेश्वर कांबळे, किरण सुर्यवंशी, विजय सोमवंशी, धोंडीराम सोमवंशी, उत्तम सोमवंशी, विश्वनाथ सोमवंशी, नागनाथ सोमवंशी , किशोर बनसोडे, तुकाराम बनसोडे, सय्यद नूरपशा , अभिमन्यू बनसोडे, आणि पोलीस प्रशासन रहेमान पटेल यांचे सहकार्य लाभले.