दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- भाजपा युवा मोर्चा कंधार तालुका उपाध्यक्ष श्री. बालाजी पाटील वडजे मसलगेकर यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तरी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेड येथे गरजु लोकांना बालाजी पाटील वडजे मसलगेकर यांच्या वतीने व हस्ते जेवणाच्या १०० डब्यांची व्यवस्था करण्यात आली होती दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. समाज सेवेची आवड असलेले बालाजी पाटील वडजे हे प्रत्येक वर्षी त्यांच्या जन्म दिवसाच्या दिवशी काही ना काही तरी सर्वसामान्यांची गरज भागवण्याचे काम करत असतात राजकारणाचा कुठलाही वारसा नसून त्यांनी राजकारणामध्ये त्यांना वेगळ्या दृष्टीकोनातून आजच्या परिस्थितीत बघीतले जात आहे त्यांचा २३ वा वाढदिवस हा नांदेड,नायगाव,नर्सी,मुखेड नंतर त्यांच्या गावामध्ये मसलगा येथे मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.या वेळी बाहेर गावाहून वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले भाजपा चे माधव पाटील जाकापुरकर, भाजपाचे ज्ञानेश्वर पाटील शिंदे, महेश पाटील शिंदे, सहदेव पाटील शिंदे,हाणमंत पाटील जाधव,राजेश पाटील सिरशे,ऋषि पाटील शिंदे ,साईनाथ पाटील शिंदे, अविनाश ननुरे,देवराज घंटेवाड, व गावातील सर्व युवा मित्र परिवार उपस्थित होते.